पुणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेला पक्षचिन्ह आणि नावासाठी दोन्ही गटाचा संषर्ष चालला. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले. त्यांच्या या लढाईने राज्याची समीकरणं बदलून टाकणारी ठरली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अशीच फूट पडली. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार असे दोन गट पडले. दोन्ही गटांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने निसर्ग मंगल कार्यालयात मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बारामती मतदारसंघातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा समन्वयक आणि तालुका प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
‘शिवसेनेने अनेक वर्षे संघर्ष केला. त्यावेळी आम्ही सत्तेत होतो. मात्र आता आम्ही संघर्ष करण्यास शिकत आहोत. आगामी निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर, राज्याची अस्मिता आणि अस्तित्व टिकविण्याची लढाई आहे’, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
‘दिल्लीतील सरकार राज्य चालवित आहे. पक्ष फोडले जात आहेत. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यांनी त्याची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली होती. त्यामुळे शिवसेना बाळासाहेबांचीच आहे. त्यामुळे कोणता पक्ष फुटला असे म्हणता येणार नाही. पक्षातून एक गट फुटला आहे, असे म्हणता येईल’, असे सुळे म्हणाल्या आहेत.
‘भाजपही भ्रष्ट जुमला पक्ष आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. साम, दाम, दंड आणि भेद या पैकी कोणत्याही नीतीचा वापर करण्यास तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे. त्यामुळे वाटते तेवढी ही निवडणूक सोपी नाही. या निवडणुकीकडे केवळ निवडणूक म्हणून पाहता येणार नाही. राज्याची अस्मिता आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व टिकविण्यासाठीची ही लढाई असणार आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे लागतील’, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘ज्या २२ आमदारांचा उल्लेख केला त्यातली २ तरी जाहीर करा’; सुनिल शेळकेंचे रोहित पवारांना आव्हान
-महापालिका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल; कारवाई होण्याआधीच रोख रकमेसह फरार
-बारामतीतून लढण्यावरून सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “उमेदवार म्हणून माझंच नाव…”
-पुणे काँग्रेमध्ये “लेटर बॉम्ब”चा झटका, लोकसभा उमेदवारीवरून आबा बागुलांचा इच्छुकांना दणका