पुणे : महाराष्ट्र राज्य सहकरी बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीनचीट मिळाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. ही क्लिनचीट अलीकडे देण्यात आली नसून ती जानेवारी महिन्यात जेव्हा अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली होती. तेव्हा सुनेत्रा पवार यांना देखील देण्यात आली होती. त्या क्लोजर अहवालाची प्रत मंगळवारी समोर आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालानुसार, जय एग्रोकडून जरंडेश्वर शुगर मिल्क प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज देण्याच्या २ वर्षापुर्वीच, म्हणजे २०१० सालीच सुनेत्रा पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे क्लोजर अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात जानेवारी महिन्यात अहवाल सादर केला होता. त्याचा तपशील आता जाहीर करण्यात आला आहे. त्यात शिखर बँकमध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नसल्याचे मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने आपल्या अहवालात म्हटलं आहे. कर्ज वाटप करतांना बॅंकेला कोणतंही नुकसान झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत.
या बँकेची नाबाडने २०१० साली तपासणी केली होती. त्यानुसार २०१३ मध्ये चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये या घोटाळ्यात कुठलाही पुरावा सापडत नसल्याने तपास बंद करत असल्याचा अहवाल मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने जमा केला आहे. आता हा अहवाल अजूनही न्यायालयाने फेटाळेला नाही. यातच या घोटाळ्यासंदर्भातील तक्रारदारांनी पुन्हा आक्षेप घेतला आहे. मात्र मुळ तक्रारदाराने यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयात सध्या गलबतं सुरू झाली आहेत. त्यामुळे हा अहवाल न्यायालयाने अद्यापही स्विकारलेला नाही.
महत्वाच्या बातम्या-
-पुरंदरमध्ये अजित पवारांची ताकद आणखीन वाढली, ‘या‘ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
-शिरूरमध्ये मनसे आढळराव पाटलांच्या साथीला! मनसे पाठिंब्याने ताकद वाढली
-मुरलीधर मोहोळांची प्रचारात आघाडी, सहाही मतदारसंघात पहिला राऊंड पूर्ण! नागरिकांचा मोठा प्रतिसाद
-“अजितदादांनी ‘त्या’ पाण्याबाबत दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही”- सुनेत्रा पवार