पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांना उमेदवारी मिळाली आहे. राज्यभरातून आज अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यातच पुण्यात पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, बागुलांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे ३ अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आबा बागुलांच्या या उमेदवारी अर्जाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
आबा बागुल हे पर्वती मतदारसंघातून उमेदवारीसाठी आधीपासूनच आग्रही होते. त्यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवारांची अनेकदा भेटही घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीध्ये हा मतदारसंघ काँग्रेस की राष्ट्रवादी कोणाकडे जाणार यावर अद्याप शिक्तामोर्तब झाले नाही. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे आबा बागुल यांनी आता ३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून अद्याप पर्वतीमध्ये कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे असणारा हा पर्वती मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेण्यासाठी आबा बागुल आग्रही असून पर्वतीमधून निवडणूक लढण्यास बागुल इच्छुक आहेत. “आपल्याला उमेदवारी मिळण्याचा विश्वास असून आज गुरुपुष्पामृत मुहूर्त असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला”, असे आबा बागुल यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इंदापूरात तिहेरी लढत; हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारी अर्ज भरला; भरणे, मानेंना देणार टक्कर
-मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ
-मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?
-Ambegaon: ‘वळसे पाटलांमुळे माझं जगणं कठीण झालंय’ उमेदवारी अर्ज भरण्याआधी आंबेगावात राजकीय राडा
-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरेना! इच्छुकांचा जीव टांगणीला