पुणे : देशात एकीकडे स्वातंत्र्यदिनाची (१५ ऑगस्ट) तयारी सुरु आहे. अशातच आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमला इसिसच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडण्यात मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी इसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला दिल्लीतील दर्यागंजमधून अटक केली आहे.
रिझवान हा पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित होता. आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल रिझवानवरती ३ लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या विषेश पथकाला एनआयएकडून रिजवान अलीसंदर्भात इनपूट मिळाले होते. त्यानंतर रात्री ११ वाजता बायोडायवर्सिटी पार्क येथे त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी काही हत्यार देखील जप्त केली आहे. त्यात एक स्टार पिस्तूल, ३ कारतूस आणि २ मोबाइल फोन जप्त केले आहे.
दिल्ली पोलिसांनी रिझवानला अटक केल्यानंतर युएपीए अंंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य २ दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. सध्या रिझवान अटकेत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा लांडगेंकडून ‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’चे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद