पुणे : संपूर्ण देशभरात सध्या कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्काराची चर्चा सुरु असून देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. बलात्कार झालेल्या डॉक्टरचा खून करण्यात आला आहे. अशा संतप्त वातावरणामध्ये देशातील डॉक्टर्स संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षितता वाढविण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला आहे.
महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात आणखी ८३ सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. याचबरोबर आवारात आणखी १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा अधिष्ठता डॉ. एकनाथ पवार यांनी सोमवारी घेतला.
डॉ. पवार यांनी घेतलेल्या या बैठकीला बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव, उपअधीक्षक डॉ. सोमनाथ खेडकर, अधिसेविका आणि मार्ड पुणेचे उपाध्यक्ष डॉ.दस्तगीर जमादार आदी उपस्थित होते. या बैठकीत महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्हींची संख्या वाढविण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तोंडाजवळ आलेला घास बँका घेतायत हिसकावून; लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला
-मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडी, इन्कम टॅक्सची कारवाई; पहाटेपासून कारवाई सुरु
-ऐन विधानसभेच्या तोंडावर अजितदादांच्या ‘या’ नेत्याने दिला डच्चू; ‘घड्याळा’ऐवजी हाती घेणार ‘मशाल’
-पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्वाची अपडेट; रक्ताचे नमुने बदल्यास मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक
-मराठा आरक्षणाबाबतच्या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी काढली लायकी, नेमकं काय झालं?