पुणे : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी फुटीवरुन अनेक चर्चा रंगल्या. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला देखील अजित पवार आणि शरद पवार एकत्र मंचावर येणार आहेत. त्यावरुन शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हापासून वारंवार हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र येणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार वंदना चव्हाण यांनी अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणं अशक्य असल्याचे सांगितलं आहे.
‘कुटुंब हे एकत्र होतं सध्या त्यांच्यामध्ये फाळणी झाली असली तरी हे कुटुंब एकत्र यावं असं वाटणं वावगं नाही. मात्र सध्या जो राष्ट्रवादीचा दुसरा गट आहे. तो एका वेगळ्या विचारधारेसोबत गेला आहे. त्या विचारधारेशी जुळवून घेणं आमच्यासाठी अशक्य गोष्ट असून आम्ही आयडिओलॉजीशी कॉम्प्रोमाइज करू शकत नसल्याने दोन्ही गट एकत्र येणं अशक्य आहे’, असं वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे.
सत्तेत राहण्यासाठी काहीजण अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या विचारात आहेत का? असं विचारलं असता वंदना चव्हाण म्हणाल्या, “सत्तेमध्ये राहिल्यानंतर आपण काम करू शकतो असं काही जणांना वाटत आहे. ते अत्यंत चुकीचा आहे. सत्तेत नसताना देखील तुम्ही लोकांची काम करू शकता हा शरद पवार यांच्यासोबत असलेल्या प्रत्येकाचा ठाम विश्वास आहे. शरद पवार यांच्या रूपाने आम्हाला मोठं व्हिजनरी नेतृत्व मिळाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही यापुढे काम करू. जे नेते आयडियलॉजीवर ठाम नसतील ज्यांचा बेस पक्का नसेल ते नेते कदाचित त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार असतील मात्र आम्ही आयडॉलॉजिकली स्ट्राँग असल्याने कोणतंही अमिश दाखवलं तरी आम्ही तसा विचार करू शकत नाही.”
महत्वाच्या बातम्या-
-RTE ऑनलाईन प्रवेश अर्जाला आजपासून सुरवात; असा भरा अर्ज…
-महायुतीत मिठाचा खडा! तर भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासणार; बारामतीत नेमकं काय घडलं?
-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पुण्यासह ५ शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार
-समाजकंटकांकडून टेकड्या जाळण्याचा प्रयत्न; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या महत्वाच्या सूचना