पुणे : देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यात मोठा धक्का बसला असून अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा खासदार शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी ट्विट केलेल्या पोस्टमुळे वळसे पाटील हे शरद पवार गटात जाणाच्या चर्चांना सुरु झाल्या आहेत.
काय आहे पूर्वी वळसे पाटील यांची पोस्ट?
शिरूर लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय, मनपूर्वक अभिनंदन, अशा आशयाचा मजकूर पोस्ट करत अमोल कोल्हेंना शुभुच्छा दिल्या आहेत.
बारामती लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना देखील विजयांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावरुन वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात कम बँक करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. पूर्वा वळसे पाटलांच्या या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये; या कर्मचाऱ्यांना दिला सज्जड दम, वाचा काय नेमकं प्रकरण
-विशाल अग्रवालच्या अडचणी वाढल्या; महाबळेश्वरमधील ‘त्या’ पंचतारांकित हॉटेलवर चालवला जेसीबी
-अजित पवार गटाचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, ‘आम्ही तुमच्यासोबत’
-पुणे हिट अँन रन: रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर