पुणे : अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर आता युपीएससीने मोठी कारवाई केली आहे. युपीएससीने आता पूजा खेडकर यांचे प्रशिक्षणार्थी पद कायमचे रद्द केले आहे. युपीएससीने पूजा खेडकर यांना मोठा धक्का दिला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गैरवर्तन केले. त्यानंतर खोटी कागदपत्रे तसेच कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या मुद्द्यांवरुन पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीने कायमची रद्द केल्याचे आता समोर आले आहे.
यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असेही यूपीएससीकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. एकीकडे यूपाएससीनं त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पटियाला न्यायालयाने निर्णय दिलेला नाही.
दरम्यान, पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला. आता ते म्हणत आहेत की, पूजाची पोलीस कोठडीत चौकशी झाली पाहिजे. पण मी काय केलं आहे? सरकारी यंत्रणांनी माझ्यावर गुन्हा दाखल करताना इतकी तत्परता का दाखवली. मला माझ्या बचावाची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी मिळाली पाहिजे, अशी बाजू पूजा खेडकरचे वकिल अॅड. माधवन यांनी न्यायालयामध्ये मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’