पुणे : अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला असल्याची माहिती गृह विभागाकडून मिळाली आहे. इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा २५ फेब्रुवारीपासून फरार होता.
कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपूरमधून फरार झालेला प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. अखेर १ महिन्यानंतर कोरटकर हा तेलंगणामध्ये पोलिसांच्या हाती लागला. तेलंगणामध्ये नोंद झाल्यानंतर कोल्हापूर पोलीस कोरटकरला ताब्यात घेणार आहेत.
दरम्यान, इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी धमकी दिल्यामुळे कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद दिली होती. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे. ‘कोरटकरचा अंतरिम जामीन उच्च न्यायालय फेटाळणार असल्याची जाणीव झाल्यानंतर त्याच्यासमोर पोलिसांना शरण येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी त्याला अटक केली, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं ‘त्या’ ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली
-पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर
-‘…तर कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार’ पुण्यात शिवसैनिक आक्रमक
-हिंजवाडी जळीत हत्याकांड: ‘माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवलं जातंय’; बस चालकाच्या पत्नीचा दावा
-सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू; छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजांचा इतिहास अनिवार्य असणार