नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून मतदानाच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती असून यंदा देशभरात एकूण सात टप्पांमध्ये मतदान पार पडणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये ७ मे रोजी तिसऱ्या टप्यात मतदान पार पडेल. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
असा असणार निवडणूक कार्यक्रम
एकूण ७ टप्प्यांमध्ये होणार मतदान
४ जून रोजी पार पडणार मतमोजणी
पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान
दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिल मतदान
तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मेला मतदान
चौथ्या टप्यात १३ मे रोजी मतदान
५ व्या टप्यात २० मे रोजी मतदान
६ व्या टप्यात २५ मे रोजी मतदान
७ व्या टप्यात १ जून रोजी मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त एस.एस. संधू, ज्ञानेश कुमार उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केल्या आहेत. भारतातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन राजीव कुमार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?
-सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन ‘ॲक्शन मोड’
-मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? बारणेंच्या नावाची चर्चा मात्र भाजप, राष्ट्रवादी आग्रही
-वसंत मोरेंच्या विरोधात मनसे उभी ठाकली; कात्रजमधील पोस्टरची चर्चा
-लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यांची बदली; आता ‘हे’ असणार नवे पालिका आयुक्त