पुणे : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या विधानसभा मतदारसंघापैकी असलेल्या इंदापूरमध्ये आणखी एक ट्वीस्ट आला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूरच्या जागेवरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. महायुतीमध्ये ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षासाठी ती जागा सोडायची असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी असून भाजपचे नेते माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून तिकीट मिळणार नसल्याची शक्यता आहे.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे असल्याने ही जागा महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याची दाट शक्यता आहे. अशातच आता हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा असतानाच हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या चर्चेवर आता खुद्द हर्षवर्धन पाटलांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
‘मी कोणाच्याही संपर्कात नाही. माझ्याशी देखील कोणी संपर्क केला नाही’, असे म्हणत हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पुढे पाटील म्हणाले की, ‘ज्याच्या विद्यमान आमदार असेल त्याला ती जागा सूटणार, असा चर्चा आहेत. आम्ही, आमचे कार्यकर्ते हे लोकसभा निवडणुकीत चांगले आणि विधानसभेत वाईट असे होते आहे. हे फक्त एकदा नाही मागील सहा निवडणुकांमध्ये झाले आहे’, असे सांगताना हर्षवर्धन पाटलांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होता.
महत्वाच्या बातम्या–
-देशातील सर्व शाळा राजीव गांधी इ-लर्निंग सारख्या होवोत, सुप्रिया सुळेंनी केलं आबा बागुलांचे कौतुक
-भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
-बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…