पुणे : ताम्हिणी घाट परिसरामध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात झाला असून धोकादायक वळणावर बस दरीत कोसळल्याने पाच ठार तर १२ ते १३ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना पुढे आली आहे. चाकण येथून महाडला लग्नासाठी जात असताना शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात खाजगी बसचा अपघात होऊन पलटी झाली. पुण्यातील लोहगाव येथील जाधव कुटुंबीय महाड बिरवाडी येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर गाडी पलटी झाली आहे. यामधे २ पुरुष व ३ महिला अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बसमधील २७ जखमी प्रवाशांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी काम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस बांधवांच्या घरांसाठी आमदार रासने आक्रमक; विधानसभेत प्रश्न मांडत पुनर्विकासाची मागणी
-ईव्हीएममध्ये घोळाचा आरोप, पवारांची माघार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-मोहोळ कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कार्यकर्त्याला आणखी काय हवं’
-चेहरा भोळा अन् कुटाने सोळा! प्रसिद्ध बिल्डरचे ४ कोटी लुटणाऱ्या गुडियाला बेड्या
-‘लाडक्या बहिणीं’साठी खूशखबर! फडणवीसांनीच सांगितलं योजनेचा हफ्ता कधी येणार