पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवारांनी आपल्या जनसन्मान यात्रेला नाशिकमधून सुरवात केली असून या यात्रेमधून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, याच दौऱ्यात अजित पवारांच्या जीवाला धोका असून त्यांच्या मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागीय पोलीस प्रशासनाला सूचना आहे. गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात धोकादायक हालचाली अनेक दहशतवादी संघटनांकडून असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांची अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
दरम्यान, अजित पवार हे सोमवारी धुळे आणि मालेगाव दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये सर्वाधिक गुलाबी रंगाचा वापर झाला असून या जनसन्मान यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात अजित पवारांच्या या गुलाबी रंगाच्या वापराची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Big Boss Marathi: सुरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’वर अक्षय कुमारही थिरकला
-‘माझा फोन हॅक झालाय’; सुप्रिया सुळेंच्या मोबाईल हॅकने राजकीय वर्तुळात खळबळ
-अजित पवारांच्या ‘त्या’ चुकीमुळे नाराज आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर मनसेला पुण्यात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
-Big Boss Marathi: निक्कीनंतर रितेश भाऊ घेणार ‘या’ स्पर्धकाची शाळा