पुणे : राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडल्याचे पहायला मिळाली आहे. देशातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांची दिल्ली येथील निवासस्थान १० जनपथ येथे भेट घेतली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटील गेले आहेत. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
शरद पवारांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांच्या झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. या भेटीनंतर अजित पवारांना माध्यमांना संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, “राजकारणापलिकडे काही नाती असतात. ही राजकीय भेट नव्हती. वाढदिवसानिमित्त त्यांचे दर्शन घेतले. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार, ससंदेचे अधिवेशन, नागपूरचे हिवाळी अधिवेशन याबाबत चर्चा झाली,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
शरद यानिमित्ताने पवारांवर विविध स्तरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षात होत आहे. अजित पवारांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह शरद पवारांची भेट घेतली. अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, आमदार छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेते होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत केले. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, कन्या रेवती सुळे, प्रतिभाताई पवार यावेळी उपस्थित होत्या. ही कौटुंबिक भेट असल्याचे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भटक्या कुत्र्यांनी तब्बल १४ हजार पुणेकरांना घेतला चावा; पालिका प्रशासनावर नागिरकांची तीव्र नाराजी
-‘वेळ पडल्यास स्वबळावर लढणार’; शरद पवारांच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-विधानसभेनंतर लक्ष महापालिकेवर, ८ मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी जोरात
-लोकसभा, विधानसभा झाली तरीही पवार विरुद्ध पवार सामना सुरुच; बारामतीत नेमकं काय घडतंय?