पुणे : पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला रामराम केला. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली मात्र वसंत मोरे यांना काही उमेदवारी मिळण्याची उमेद नाही मिळाली. वसंत मोरे यांनी मराठा आंदोलक समितीकडे देखील आपला मोर्चा वळवला होता. मात्र तिथेही सूत न जुळल्याने मोरे वंचितच्या वाटेने निघाले.
पुणे लोकसभा निवडणुकीत वेगळा प्रयोग करुन दाखवणार म्हणणाऱ्या वसंत मोरे यांना अखेर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. वंसत मोरे वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘मोरेंनी वंचितच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज भरला तरी त्यांचं स्वागत असेल’, असं धंगेकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर आज अखेर याबाबतच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वसंत मोरे यांच्या रुपाने वंचितने पुण्यात तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. यापूर्वी वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहारा म्हणून ओळखले जात होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित-एमआयएम आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतली. याचा अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांना पराभवाचा झटका बसला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही वंचित आघाडीने अशीच कामगिरी केल्यास पुण्यात वसंत मोरे हे भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना अडचणीचं ठरु शकतं.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. pic.twitter.com/a1Gx2b9nKg
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 2, 2024
सध्याच्या घडीला पुणे मतदारसंघात मोहोळ आणि धंगेकरांचे पारडे जड दिसत आहे. मात्र आता वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पुणे लोकसभा निवडणुकीत काय चित्र असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मोरेंसाठी प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात सभा घेतल्यास दलित मतदार मोरे यांच्या पाठिशी उभा राहण्याची शक्यता आहे.
माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात-धर्मीय ‘वंचित बहुजनांसाठी’ मी मैदानात येतोय..!
बदल घडणार…वसंत फुलणार…!#पुणे_की_पसंत_मोरे_वसंत pic.twitter.com/mhd0XmAvE1
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 2, 2024
दरम्यान, वसंत मोरे हे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतात. तसेच मोरेंचा मोठा चाहतावर्ग आहे. कात्रजच्या दोन्ही बाजूकडील म्हणजे बालाजीनगरपासून अगदी आंबेगाव पठार ते खडकवासला विधानसभा मतदारसंघावर देखील वसंत मोरे यांचा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हे मोहोळ आणि धंगेकर यांच्यासमोर निश्चितच मोठं आव्हान असू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
-Big Breaking: अखेर तात्यांना ‘वंचित’कडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ, धंगेकरांपुढे मोठं आव्हान?
-Baramati Lok Sabha | ताई-वहिनींच्या लढतीत बेहनजींची एन्ट्री; बारामतीत देणार उमेदवार
-‘आम्ही दडपशाही नाही, लोकशाही माननारे, लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही..’- सुप्रिया सुळे
-“विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे” -मुरलीधर मोहोळ