पुणे : मराठी बिग बॉस सिझन ५ची दमदार सुरवात झाली असून बिग बॉसच्या घरात गेलेल्या १६ सदस्य आपाली एकमेकांशी ओळख करुन घ्यायला लागले आहेत. एकेकाळी टिकटॉकवर धुमाकूळ घालणारा सूरज चव्हाणही या ‘बिग बॉस’च्या घरात गेला आहे. एका छोट्याशा गावातून आलेल्या सूरजने बीग बॉसच्या घरात जाताच आपलं यश पाहण्यासाठी आई-वडिल राहिले नसल्याचे सांगितले आहे.
बिग बॉस सिझन ५ च्या पहिल्याच दिवशी सूरज चव्हाण हा पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण आणि आर्या जाधव यांच्याशी बोलताना त्याच्यावरील आई-वडिलांचं छत्र कसं हरपलं हे सांगितलं. सूरज चव्हाण म्हणाला की, ‘लहापणाापसून हलाखीची परिस्थितीत दिवस काढले आहेत. लहान असताना वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे आईला मोठा धक्का बसला. त्यानंतर एके दिवशी आईला रक्ताची उलटी झाली. एकीकडे माझी आई आणि दुसरीकडे आजी या दोघींचे एकाच दिवशी देवाघरी गेल्या. आता मला फक्त एक आत्या आणि ५ बहिणी आहेत.’
View this post on Instagram
त्यानंतर पॅडीने सूरजला विचारले की, ‘तू अरे व्हिडीओ टाकतो त्यावर बहिणी काय म्हणतात तुला?’ त्यावर ‘मला खूप लुबाडले. तर त्या मला म्हणतात की, तू सुधर. तू सुधारलास तर आम्हाला लय बरं वाटेल. मला टिकटॉकच्या वेळी रिबीन कापायला ८० हजार रुपये मिळायचे. आता ३०-५० हजार रुपये मिळतात’, असे सूरजने बीग बॉसच्या घरात सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीत संमतीशिवाय फोटो वापरला; महिलेची पुण्यातील भाजप आमदाराविरोधात तक्रार
-अजित पवार शरद पवारांसोबत जाणार?; कार्यकर्ते म्हणाले, ‘दादांना पक्षात घेतले तर…’