पुणे : बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन संपला बारामती तालुक्यातील एका छोट्याशा गावातील सुरज चव्हाण विजेता झाला. अन् अख्खा महाराष्ट्र त्याने डोक्यावर घेतला. अवघा महाराष्ट्रात झापूक झूपूक ऐकू येत आहे. त्यानंतर हिंदी बिग बॉस सुरु झाले. हिंदी बिग बॉस सिझन १८ ची सुरवात झाली असून या शोचे होस्टिंग भाईजान सलमान खान करत आहे. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते हे देखील बिग बॉस १८ मध्ये दाखल झाले आहेत.
मराठा आरक्षणावर गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मराठा समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. गुणरत्न सदावर्ते हे थेट बिग बॉस हिंदीमध्ये दाखल झाले. बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांनी निर्णय घेत थेट गुणरत्न सदावर्ते यांना घरातील जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जोरदार विरोध करण्यात आल्याचे बिग बॉसमध्ये पहायला मिळाले.
गुणरत्न सदावर्तेंनी डंके की चोटपर सांगितले की, ‘मला कोणीही जेलमध्ये टाकू शकत नाही. मला सरकार घाबरते मला दाऊद इब्राहिम घाबरतो. त्यानंतर बिग बॉसने देखील गुणरत्न सदावर्ते यांना सांगितले की, तुम्हाला घरातील जेलमध्ये जावे लागेल. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, मी नॉमिनेशमध्ये जाईल पण जेलमध्ये जाणार नाही’. यंदा मराठी बिग बॉसमध्ये झापूक झूपूक आणि हिंदी बिग बॉसमध्ये डंके की चोटपर पहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठी सीजन ५ चा विजेता सुरज चव्हाणचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजित पवारांना गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसमध्ये गेले आहेत यावरुन प्रश्न विचारण्यात आला. मात्र, अजित पवारांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल बोलणे टाळल्याचे बघायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
-‘मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे’- आमदार माधुरी मिसाळ
-वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन
-शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी
-‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन