पुणे : सध्या प्रत्येकाच्या घरात एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीजनची. ९० दिवसाचा हा सीजन ७० दिवसातच पार पडणार असून हा बिग बॉस मराठी ५ चा शेवटचा आठवडा आहे. ‘झापुक-झपुक आणि गुलीगत धोका’ अशा डायलॉगने संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या बारामतीच्या सुरज चव्हाणच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह आता राजकीय नेते देखील सुरजला पाठिंबा देताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांना सुरजला वोट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ‘तो जिंकला पाहिजे’ अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. तसेच युगेन्द्र पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत सुरजला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
‘आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र, प्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय. देशभर त्यांची क्रेझ वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये २७४ लोकांमधून अंतिम १६ मध्ये त्याची निवड झाली, ही आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यामुळे तुम्ही देखील आपल्या कामातून वेळ काढून सुरजला बिग बॉस मराठी ५ चा महाविजेता करण्यासाठी वोट करा. त्यासाठी जिओ सिनेमा अप्लिकेशन इंस्टॉल करुन Big Boss Marathi या टॅबवर जाऊन Vote Now वर गेल्यावर सूरजच्या फोटोवर टच करुन आपलं वोट सबमिट करा, अशी विनंती युगेन्द्र पवार यांनी केली आहे.
आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र, प्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय. देशभर त्यांची क्रेझ वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये २७४ लोकांमधून अंतिम १६ मध्ये त्याची निवड झाली, हि आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी… pic.twitter.com/Y0YnknXdi4
— yugendrapawarspeaks (@yugendraspeaks) October 1, 2024
या आठवड्यात मिड विक एव्हीक्शन होणार असून बिग बॉसच्या घरातील ६ पैकी १ सदस्य बाहेर जाणार आहे. यामुळे आता शेवटच्या आठवड्यात नक्की कोण सुरक्षित राहत आणि कोण ‘बिग बॉस मराठी सीजन ५’ची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. राज्यात निवडणुकीच वार वाहत असताना संपूर्ण पवार कुटुंब सुरजला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आल्याचे पाहयला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! ‘या’ शुभ मुहूर्तावर फुंकणार ‘तुतारी’
-प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक; नेमकं कारण काय?
-वडगाव शेरी विधानसभा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक लढणार!
-बालेकिल्ल्यात अजितदादांना आणखी एक मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं साथ सोडताच केली जहरी टीका