पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पुण्यातून मोठा धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचा प्रचार,प्रसार करणारे भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवि लांडगे यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
रवि लांडगे हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या २० ऑगस्ट रोजी मुंबईत ‘मातेश्री’वर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवि लांडगे हे शिवसेनची मशाल हाती घेणार आहेत. रवि लांडगे हे मंगळवारी सकाळी ५०० गाड्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. रवि लांडगे हे भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
ज्या पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक होते, तिथेच अंकुशराव लांडगेंनी भाजपची पाळेमुळे चांगलीच रोवली. त्यानंतर लांडगे घराण्याचा वासर म्हणून रवि लांडगे हे २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लांडगे कुटुंब हे शहराच्या राजकारणात भाजपचे निष्ठावान म्हणून ओळखले जाते. अशातच आता रवि लांडगे यांनी हाती मशाल घेण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला पिंपरी चिंचवडमधून मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मराठा आरक्षणाबाबतच्या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी काढली लायकी, नेमकं काय झालं?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीत राडा; जगदीश मुळीकांनी काढली अजित पवारांच्या आमदाराची पात्रता
-पुण्यात ट्रॉफिक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन; वाहन चालकांकडून ओवाळणी म्हणून घेतलं ‘हे’ महत्वाचं वचन
-सुप्रियाताई-अजितदादा रक्षाबंधन साजरा करणार का? अजित पवार म्हणाले, ‘तिच्याकडे…’
-‘बारामतीतून निवडणूक लढविण्यात रस नाही’ अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, ‘जिथून…’