पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने भाजपला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शरद पवारांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कातंंत्राचा वापर केला आहे. समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब पठारे असे अनेक बडे नेते गळाला लावले आहेत.
त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काकडे हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. दसऱ्यानंतर संजय काकडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय काकडे हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षात पक्षाकडून काहीही मिळालं नसून, भाजपकडून फक्त माझा वापर झाला अशी खदखद संजय काकडेंनी बोलून दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जुन्नर विधानसभेत मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाखतीत अचानक पोहचला काँग्रेस नेता
-सस्पेन्स कायम! अजित पवार बारामतीमधून लढण्याबाबत म्हणाले, ‘महायुतीत…’