पुणे : सध्या पुणे शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाहीये. अशा बेशिस्त चालकांमुळे शहरात वाहतूक कोंडी, तसेच अपघातांचे धोके वाढले आहेत.
विशेषत: बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या बुलेटस्वारांची संख्या वाढत आहे. यातून ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. याला आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी २ दिवसांत तब्बल ५७१ बुलेटस्वारांवर कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका दिला आहे. दोन दिवसांत तब्बल 571 बुलेटवर कारवाई करून सायलेन्सर जप्त केले आहेत. संबधित चालकांवर दंडात्मक कारवाई करून जप्त केलेल्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी बुलडोझर चालवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
शहरातील हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, हांडेवाडी, डेक्कन, भारती विद्यापीठ भागात हे प्रकार सर्वाधिक असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी 8087240400 या व्हॉट्सऍप नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन नागरिकांना वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आता फक्त एकच दादा ते म्हणजे…” वागळेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
-राज ठाकरे ‘इतिहास संशोधक मंडळा’त पोहचले अन् दिली ‘ही’ मोठी देणगी
-पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
-“देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं”
-“तुझ्या बापाने पाहिला का माझ्याबरोबर काँन्ट्रॅक्टर”; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर अजितदादा भडकले