पुणे : चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान उद्या सोमवारी १३ मे रोजी पार पडणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरुर आणि मावळ मतदारसंघातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळित पार पडण्यासाठी सर्व स्तरावर काळजी घेतली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदा मद्य विक्री आणि तस्करीविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे.
पुणे शहर, शिरुर, मावळ मतदारसंघातील मतदान सोमवारी (१३ मे) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागाकडून बेकायदा दारु, वाहतुकीप्रकरणी ८३३ गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईत पोलिसांनी ६६१ जणांना अटक केली आहे. तब्बल ३८ हजार ५०६ लिटर गावठी दारू, १५ हजार ५१ लिटर देशी मद्याच्या बाटल्या, विदेशी मद्य, बिअरच्या बाटल्या, तसेच सहा हजार ६१८ लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू विक्री, वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके नेमली आहेत. भरारी पथकांकडून बेकायदा दारू वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवली जात असल्याचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी सांगितले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ, पुणे, शिरुर मतदार संघात १७ पथके गस्त घालणार आहेत. ‘कुठेही बेकायदा मद्य वाटप, बेकायदा विक्री असे प्रकार आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे साधावा’, असे आवाहन jराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांक – १८००२३३९९९९
दूरध्वनी क्रमांक – ०२०-२६०५८६३३
महत्वाच्या बातम्या-
-‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी ‘हिरामंडी’मधली आलमजेब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
-Mother’s Day : संजय दत्त ‘मदर्स डे’च्या दिवशी भावूक; आईची ‘ती’ इच्छा अधुरी राहिल्याची आजही खंत
-पुणेकरांना पाणी कपात; बारामतीला मात्र नियोजनापेक्षा जास्त पाणी
-मतदानाच्या दिवशी पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त, तब्बल ५ हजार पोलीस असतील तैनात, वाचा…
-चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; शेवटच्या टप्प्यात महायुतीचाच बोलबाला