पुणे : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनामध्ये राज्यातील अनेक प्रश्नांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. अशातच आज सभागृहामध्ये विरोधर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. विधानसभेत चर्चा सुरु असताना विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात हजर नव्हते.
सभागृहामध्ये अनेक मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन शाब्दिक चकमक पहायला मिळाली. त्यावर विरोधकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. ‘मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत तो पर्यंत सभागृह तहकूब करा’ अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. तसेच आज सभागृहामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील चांगलेच संतापले होते.
“सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाहीत. मग अधिवेशन कशासाठी सुरु आहे? प्रश्नांची दखल कोणी घ्यायची? महाराष्ट्रातील जनतेची दु:ख कोणी ऐकायची? अधिकाऱ्यांना चेंबरमध्ये बसून लोकांची दु:ख कळतील का? सरकारने या अधिकाऱ्यांना कशासाठी लाडावलं आहे. या सरकारमुळे हे अधिकारी डोक्यावर बसायला लागले आहेत. पण यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांनी सभागृहाच्या लॉबीत येऊन बसलं पाहिजे. लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत”, असं म्हणत भास्कर जाधव सभागृहात चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात येणार? शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
-वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच मोरे म्हणाले, ‘मी पक्षात प्रवेश केला नाही तर…’
-वसंत मोरे आज हाती शिवबंधन बांधणार; गाड्यांचा ताफा, भगवे झेंडे घेऊन मोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन