पुणे : पुणे शहरामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरामध्ये झिका विषाणूची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. एरंडवणे परिसरामध्ये काल (बुधवारी) झिकाचे २ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता शहरातील मुढवा परिसरामधील एका ४७ वर्षीय महिलेच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर तिला झिकाची लागण झाली असल्याचे निष्पण झाले आहे.
पुण्यातील एरंडवणे भागातील एक डॉक्टर आणि त्यांची मुलगी झिका पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यात झीकाचा धोका वाढताना दिसतोय. डासांपासून हा आजार पसरत असून आता ऐन वारीच्या तोंडावर झिकाचे ३ रुग्ण आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पावसाळा असल्याने अनेक आजार वाढत असतात, त्यातच पुण्यात झिकाचे ३ रुग्ण आढळले आहेत.
झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. झिकाचा प्रसार हा एडिस एजिप्ती डासापासून होतो. पुण्यात आतापर्यंत जेव्हा रुग्ण सापडलेले रुग्ण कोणाच्या संपर्कात आले नव्हते तरीही झिकाचे रुग्ण हळूहळू वाढताना दिसत आहेत. रुग्णाच्या संसर्गाची साखळी अद्याप सापडलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे
-‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाचा आनंद होणार द्वीगुणीत, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार!