बारामती : पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागांमध्ये धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या अंधारामध्ये काही ड्रोन फिरत आहेत. त्यातच बारामती तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांत वाड्यावस्त्यांवर हे ड्रोन फिरत आहेत. तसेच अनेक भागात चोरी देखील झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामतीमधाल सोमेश्वर, वाकी, वडगाव, मुर्टी, तसेच इंदापूरच्या निरा नृसिंहपूर पर्यंत तसेच अगोतीपासून दौंड तालुक्याच्या यवतमध्येही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ड्रोन उडत असून वडगाव निंबाळकर, जाधव वस्ती, बनकर वस्ती, कोऱ्हाळे, मुर्टी या भागात चोरी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यातील वरवंड, पाटस, खोर , बारामती तालुक्यातील वढाणे, मोरगाव, आंबी, कुतवळवाडी आणि पुरंदर तालुतील रिसे, पिसे, राजुरी, पोंढे या गावांच्या हद्दीतून रात्रीच्या वेळी संशयित ड्रोन फिरत आहे. यामुळे गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. या ड्रोनच्या…
— Supriya Sule (@supriya_sule) May 31, 2024
या सर्व प्रकरणाबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले मात्र त्याच दिवशी वडगाव निंबाळकरमध्ये ५ ठिकाणी घरफोडी झाली. यामुळे नागरिकांची भीती अधिकच वाढत आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घाबरु नका असे आवाहन केले असून या प्रकरणाची माहिती बारामती ग्रामीण पोलिसांकडून घेत असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इतिहास घडणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार! पुण्यात रासनेंकडून ३७० किलो पेढे वाटप
-अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचे ‘ते’ घर घेतले विकत; म्हणाली, ‘मला या घरात….’
-”त्या’ पराभवाची चीड माझ्या मनात निश्चितच, अजितदादांशी माझं बोलणं…’- संजोग वाघेरे
-संपूर्ण देशाचं लक्ष बारामती निकालाकडे; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार बारामतीच्या खासदार?