Healthy Tips : आपले शरिर तंदुरुस्त रहावे म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. जसे की व्यायाम आणि योग्य आहार. या दोन गोष्टींमुळेच आपले स्वास्थ चांगले राहते. अनेक आजारांपासून आपण दूर राहतो. सकाळचा पोटभर नाश्ता हा आपल्याला दिवसभरासाठी एनर्जी देत असतो. म्हणून शक्यतो आपण सकाळच्या आहारामध्ये पोषक घटक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. अनेकजण सकाळी ड्रायफ्रुट ही उपाशी पोटी खाण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळी खजुराचे सेवन केले तर आपल्या आरोग्याला दुप्पट फायदे होतात. खजुरामध्ये अनेक पोषक घटक असतात. खजुरमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी-6 आणि आयर्न असतात. जे आपल्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. खजूर हे पोषक तत्वांचा खजिना मानला जातो.
खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज आढळतात ज्यामुळे तुम्हाला लगेच उर्जा मिळते. सकाळी रिकाम्या पोटी खजूर खात असाल तर तुम्हाला फ्रेश वाटते.
एका खजूरमध्ये २३ कॅलरीज असतात. ज्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे सकाळी दररोज रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
हिवाळ्यात दम्याच्या त्रासाचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला दम्याचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर दम्यापासून आराम मिळतो.
खजुरांमध्ये नैसर्गिकरित्या फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. जे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून वैयक्तिकरित्या खजुराचे सेवन करून त्याचा आनंद घेण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर तुम्हाला याचा मोठा फायदा होऊ शकतो.
खजूरमध्ये असलेले तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम तुमची हाडे मजबूत करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन के रक्त घट्ट होण्यापासून थांबवतात. कमकुवत हाडे असलेल्या लोकांनी हिवाळ्यात याचे सेवन करावे.
तुम्हाला जर अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही सकाळी खजूर खाल्ले पाहिजे. खजूरमध्ये फायबर आढळते. जे पचनासाठी मदत करते. रोज रात्री खजूर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर खावेत. दररोज उठल्यावर २-३ भिजवलेले खजूर तुम्ही खाल्ले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
-नताशा-हार्दिकचा घटस्फोट; जवळच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, ‘अनेक महिन्यांपासू दोघेही…’
-मराठ्यांचा नवा सरदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचेही भव्य स्मारक उभारणार; युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा
-‘पोर्शे कार प्रकरण अन् आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ’; ४ जूननंतर सुषमा अंधारे करणार धक्कादायक खुलासे