पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे, आणि शिरुर लोकसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया सुरु आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे आणि एमआयएमकडून अनीस सुंडके यांच्यात लढत होत आहे. महायुतीने शहरात जोरदार प्रचार केला. त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांच्या आई भावूक झाल्याचे पहायला मिळाले आहे.
मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. मतदानाला जाण्यापूर्वी मुरलीधर मोहोळांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं. त्यांनी घरातील ज्येष्ठांचा आशिर्वाद घेतला आणि त्यानंतर ते कुटुंबियांसोबत मतदानासाठी रवाना झाले.
‘मुरली नक्कीच दिल्लीला जाईल. मी फक्त मुरली मोहोळची आई नाही तर मी पुणेकरांची आई म्हणून सगळ्या पुणेकरांना मतदानाचं आवाहन करते’, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळांच्या आईने दिली आहे. तर मागील २० वर्ष मुरलीधर मोहोळांनी खूप काम केलं. लोकसभेची उमेदवारी त्याचीच पावती आहे, असं मुरलीधर मोहोळांच्या पत्नी म्हणाल्या. मुरलीधर मोहोळ १०० टक्के जिंकणार असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. त्यांच्या आईलादेखील अश्रु अनावर झाल्याचंही पहायला मिळालं आहे.
‘आपली लोकशाही ही देशातली सुदृढ लोकशाही आहे आणि आपण या लोकशाहीचा भाग आहोत. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपल्याला बजावलं पाहिजे. त्यामुळे मोठ्या संख्येने पुणेकरांनी एकत्र येत मतदान करावे आणि लोकशाही बळकट करावी, असे मुरलीधर मोहोळ यांनी मतदानापूर्वी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धंगेकरांचा आरोप बिनबुडाचा? पोलीस आयुक्तांनी सांगितलं सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडलं?
-राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?
-पुण्यात उद्या होणार मतदान, निवडणूक आयोगाची जय्यत तयारी! पुणेकरांनो मतदान नक्की करा
-पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बेकायदा दारु विक्री प्रकरणी ८३३ गुन्हे दाखल
-‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी ‘हिरामंडी’मधली आलमजेब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल