पुणे : बारामती तालुक्यातील जैनकवाडीच्या घाटामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला. या टाटा हॅरिअर एका झाडाला जबर धडक झाली. या अपघातामध्ये दोन शिकाऊ पायलट युवती गंभीर जखमी झाल्या होत्या. ९ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये चेस्ता बिष्णोई या प्रशिक्षणार्थी पायलट युवतीचा बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. गेल्या १० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या चेस्ताचा आज दुर्दैवी अंत झाला. मात्र, जाता जाता चेस्ताने आठ जणांना जीवनदान दिले आहे.
चेस्ता गेले १० दिवस रुग्णालयात उपचार घेत मृत्यूला झुंज देत होती. मात्र, ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. तिचे दोन्ही डोळे, किडन्या, हृदयासह आठ अवयव दान करण्यात आले आहेत. चेस्ताच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून चौथ्या शिकाऊ पायलटची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडाला बसलेली टक्कर इतकी भीषण होती की, २१ वर्षीय प्रशिक्षणार्थी वैमानिक तक्षू शर्मा आणि आदित्य कणसे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. या चौघांनी अपघातापूर्वी आधी छोटी पार्टी केली होती आणि मद्यसेवन देखील केले होते. त्यानंतर जेवन ते एसयूव्हीने फिरायला गेले. भगवान रोडकडे गाडी भरधाव वेगाने जात होती. वळणावर चालक कृष्ण सिंह याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते झाडावर आदळले. जवळील काँक्रीट पाईपलाईनमध्ये कार अडकली.
महत्वाच्या बातम्या-
-सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला; भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ
-‘पबला विरोध नाही तर होणाऱ्या गैरप्रकारांना, मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर’- अमितेश कुमार
-‘माझं मंत्रिपद कापण्या इतपथ त्यांची पोहोच नाहीये’; विजय शिवतारेंचा रोख नेमका कोणाकडे?
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी पुणे मेट्रोची गुडन्यूज; आता मेट्रो धावणार…
-स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रो स्थानकांच्या अंतरात होणार बदल; किती अंतरावर असणार स्थानके?