Summer Health Tips : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उन्हाळा वाढत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेकजण शीतपेय पिण्यावर जास्त भर देतात. उन्हाळ्यात इतर पेयांपेक्षा सोड्याची लोकप्रियता सर्वाधिक आहे. सोड्याची लोकप्रियता सर्वाधिक लोकप्रियता असली तरीही या सोड्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. सोडा पिल्याने आपल्या आरोग्याला कोणत्या हानी होतात हे आता आपण पाहणार आहोत.
सोड्यामध्ये अनेक प्रकारची रसायने आढळतात, जी शरीरासाठी हानिकारक असू शकतात. दररोज सोडा प्यायल्यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर त्याचा परिणाम हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील होतो.
रोज सोडा प्यायल्याने शरीरातील हाडे कमकुवत होण्याप्रमाणेच अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्हीही रोज सोडा पित असाल. तर पुढे दिलेली माहिती नक्की वाचा….
सोडा प्यायल्यानं भूक लागण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे वजन वाढते.
सोड्यामुळे शरीरात केवळ जळजळच होत नाही, तर त्याचा रोगप्रतिकारशक्तीवरही विपरीत परिणाम होतो. त्याव्यतिरिक्त जीवघेणा आजार होण्याचा धोकाही वाढतो.
जे लोक दररोज सोडा पितात त्यांच्या शरीरात युरिक आम्ल जास्त प्रमाणात वाढलेले असते. जे शरीराचा दाह वाढवते. त्यामुळे सोडा पिणे शक्यतो टाळावेच.
जे लोक जास्त सोडा पितात, त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात. कारण सोड्यात आढळणारे फॉस्फरिक अॅसिड शरीरातून कॅल्शियम हळूहळू काढून टाकते.
मुतखडा ही एक अशी सामान्य समस्या आहे जी कोणालाही होऊ शकते. या स्टोनचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो. शिवाय स्टोन हा एक असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त असू शकतो. झिरो शुगर सोडा प्यायल्यानं याचाही धोका वाढतो.
महत्वाच्या बातम्या-
-आढळरावांना लीड किती मिळणार? अजित पवार म्हणतात, ‘मी ज्योतिष नाही, आमचा उमेदवार निवडून येईल!’
-पापाराजी प्रायव्हेट पार्टवर उगाच झूम करतात; नोरा फतेही संतापली
-“पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार”- मुरलीधर मोहोळ
-“पुण्यात आता ‘मुळशी पॅटर्न’ नाही कर ‘कायद्याचा पॅटर्न’ चालणार”; अमितेश कुमारांचा गुंडांना इशारा
-एप्रिल महिन्यातही उष्णतेच्या लाटा कायम; पुढच्या ५ दिवसात आणखी पारा वाढण्याची शक्यता