पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मूळचे पवार आणि बाहेरचे पवार’ या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता सुनेत्रा पवार या रविवारी मुळशी लातुक्यातील प्रचार दौऱ्यावर होत्या. सुनेत्रा पवार ताथवडे येथे येणार म्हणून माजी खासदार नानासाहेब नवले हे त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. ताथवडे येथे सुनेत्रा पवार आणि नानासाहेब नवले यांची भेट झाली.
सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांच्या घरात पाय ठेवताच ‘यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ’, असे म्हणत माजी खासदार नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवारांची प्रशंसा केली. तर सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांना नमस्कार करून नवलेंनी केलेल्या कौतुकाचा विनम्रपणे निशब्दपणे स्वीकार केल्याचे पहायला मिळाले.
काही दिवसांपूर्वीच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, चेअरमन, माजी खासदार, ज्येष्ठ नेते नानासाहेब नवले यांची पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी आशीर्वाद, पाठिंबा दिला होता.
आज मी त्यांच्या ताथवडे गावात प्रचारासाठी येणार असल्याचे समजताच ते… pic.twitter.com/rik2uojUUk
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 22, 2024
आता शरद पवार यांचेच एकेकाळचे सहकारी आणि नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवार यांना, ‘तू सर्वात बेस्ट सून आहेस’, असे म्हटले. एवढेच नाही तर खूप आग्रह करून २ घास तरी खाल्लेच पाहिजेत, असे सांगून सुनेत्रा पवारांना जेवणही करायला लावले. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
“काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांची त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी नानासाहेब नवले यांनी आपला पाठिंबा सुनेत्रा पवार यांना जाहीर केला होता. आता तू सर्वात चांगली सून आहेस”, असे म्हणत नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवार यांची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, शरद पवारांनी नानासाहेब नवलेंच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्याच नानासाहेब नवलेंनी सुनेत्रा पवारांना, ‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ असे म्हणत कौतुकाची थाप मारली. एवढेच नाही तर खूप आग्रह करून दोन घास तरी खाल्लेच पाहिजेत, असे सांगून जेवण करायला लावले.
महत्वाच्या बातम्या-
-“त्यांच्या घरी काय आया-बहिणी नाहीत का?” नवनीत राणांवर टीका करणाऱ्यांचा अजित पवारांनी घेतला समाचार
-काँग्रेसमध्ये वादाची मालिका सुरूच, बागुलांच्या विरोधात झळकवले बॅनर; धंगेकरांना डोकेदुखी
-जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज
-रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानाला आग; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही