भिगवण : बारामती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज भिगवण येथे सभेत बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी विकास कामांची माहिती दिली. आणखी विकास कामे करण्याची आश्वासने दिली. त्यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाबाबतचे प्रश्न सोडणव्याचे आश्वासनही दिले.
“दौंड तालुक्यामध्ये स्वामी चिंचवली तिथे मला जागा मिळाली भिगवणमध्ये असल्यासारखाच आहे. कशी इमारत बांधली अतिशय जबरदस्त इमारत बांधली. सगळा नॅचरल स्कोपचा फायदा करून घेतला. रस्ते वगैरे करून घेतलं कोणताही काम मी हातात घेतलं की चोख करतोच. एकतर कोणतही काम घेताना मी १० वेळा विचार करतो. पण घेतल्यानंतर अतिशय उत्कृष्ट नंबर वनच काम ही माझी खासियत आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
🔰03-05-2024 🛣️ भिगवण, इंदापूर
⏱️ बारामती लोकसभा क्षेत्र | भिगवण, इंदापूर येथे आयोजित महायुतीची जाहीर सभा
https://t.co/m4nnRjNSXl— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 3, 2024
“कामं करायला पण हिंमत लागते धमक लागते, प्रशासनावर पकड पाहिजे. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही विकास करणारी माणसं आहोत. आम्ही विरोधाला विरोध करणारी माणसं नाहीत. उगाच एकमेकांचा बांद रेटत बसायचं हे धंदे आम्हाला जमत नाहीत. कामं करायची झाली तर केंद्राचा निधी आल्याशिवाय कामं होत नाहीत”, असं म्हणत अजित पवारांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतपधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना मत देण्याचे आवाहन केले आहे.
“तिथे एक कारखाना आहे तिथे साधारण १७ हजारांचं क्रशींग होतंय कदाचित थोडसं होईल आणि पलीकडे १५ हजार टन क्रशींग होतं. ३५ हजार क्रशींग होणारे दोन कारखाने तुमच्याजवळ आहेत. तर तुम्ही कोणाच्या काकाला घाबरताय. तुम्ही काही घाबरू नका त्यांना कोणी त्यांना कोणी सांगितलं ना ऊस नेणार नाही जा जा म्हणावं दुसरा आहे आमचा उस न्यायला खमक्या आणि काटा पण योग्य पद्धतीने करणार आणि त्यांच्यापेक्षा भाव कमी जास्त देऊन दाखवणार आणि वेळेत पेमेंट करणार”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati | “सासऱ्याचे दिवस राहत नाहीत, कधीतरी सुनेचे दिवस येतील”; अजितदादांचा काकांना टोला
-…म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
-अनर्थ टळला: सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप
-“पुण्याचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी मोहोळांनी केलेले काम कौतुकास्पद” – रामदास आठवले