पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात ही निवडणूक ५ टप्प्यात पार पडणार आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदारसंघांसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, शिरुर, सोलापूर, लातूर, माढा, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या ११ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली. या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ मतदारसंघांचा समावेश असून, ७ मे रोजी मतदान आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल आहे.
महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम
एकुण जागा – ११
अधिसूचना जारी होण्याचा दिनांक – १२ एप्रिल
उमेदवारी भरण्याचा अखेरचा दिवस – १९ एप्रिल
अर्जाची छाननी – २० एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – २२ एप्रिल
मतदानाचा दिवस ७ मे
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांना तळपत्या उन्हापासून मिळणार काहीसा दिलासा; येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी
-“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”
-Baramati Lok Sabha | ‘मूळचा पवार आणि बाहेरुन आलेला पवार…’; अजितदादांना काकांचं खुमासदार शैलीत