पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोमान सुरु असलेल्या तयारीला आता रंगत आली आहे. अशातच आता महायुतीमध्ये अंतर्गत धूसपूस चव्हाट्यावर येऊ लागल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी गोपीचंद पडळकर यांचे बारामतीमधून डिपॉझिट जप्त झाले, असं म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. मिटकरींच्या या वक्तव्यावरुन भाजप युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. “राष्ट्रवादीचा प्रवक्ता बाजारू अमोल मिटकरींनी पडळकरांवर पुन्हा गरळ ओकली आहे. अशा माकडाला अजित पवारांनी आवरावे, नाहीतर आम्ही इंदापूर आणि बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार नाही”, असा इशारा युवा मोर्चाचे वैभव सोलनकर (Vaibhav Solankar) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar)दिला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात सामना रंगला होता. यावेळी अजित पवारांना भाजपचे आव्हान देत गोपीचंद पडळकरांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, अजित पवारांनी हे आव्हान मोडीत काढून पडळकरांचा दारुण पराभव केला होता. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त केलं होतं. यावरुनच मिटकरींनी त्यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तिसऱ्या आघाडीचं १५० जागांबाबत ठरलं! शिंदे-फडणवीस अन् ठाकरे-पवारांसोबत भिडणार
-“मला विधिमंडळात जायचंय महामंडळात नाही”, श्रीनाथ भिमालेंचा पर्वतीत लढण्याचा निर्धार कायम
-“भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान जन्माला येतात, चावणारे नाही” -महेश लांडगे
-दीपक मानकरांच्या पत्रकार परिषदेनंतर रुपाली चाकरणाकरांची प्रतिक्रिया म्हणाल्या…
-अजितदादांचा शिलेदार शांत बसेना! मावळात शेळकेंची डोकेदुखी काय?