पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कुरभुरी चव्हाट्यावर येत आहेत. अशातच आता महायुतीमध्येही मिठाचा खडा पडणार असल्याचं पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेत त्यांच्याच पोस्टरला काळं फासणार असल्याचा इशारा दिला आहे.
बारामतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १५ ते १९ जानेवारी दरम्यान पार पडणार आहेत. बारामतीमध्ये होणाऱ्या या स्पर्धांसाठी राज्याच्या क्रीडा मंत्रालयाने जोरदार तयार केली आहे. बारामती शहरात या स्पर्धेची माहिती देणारे पोस्टर आता महायुतीच्या वादाचा मुद्दा ठरले आहेत. शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरवर अजित पवारांचा फोटो मोठा वापरण्यात आला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छोटा लावण्यात आला आहे. फडणवीसांचा फोटो जाणीवपूर्वक छोटा लावल्याचा आरोप आता भाजप युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या फोटोला काळं फासणार असल्याचा इशारा भाजप युवा मोर्चाने दिला आहे.
भाजप कार्यकर्त्यांकडून क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जाणीवपूर्वक छोटा वापरला असून हे पोस्टर तातडीने बदलण्यास आले नाही तर या पोस्टरवरील क्रीडा मंत्र्यांच्या फोटोला काळं फासणार असल्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलणकर यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पुण्यासह ५ शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार
-समाजकंटकांकडून टेकड्या जाळण्याचा प्रयत्न; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या महत्वाच्या सूचना
-मामाला संपवण्याची तयारी; पुण्यात बंदुक घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
-पुण्याच्या एफसी रोडवरही वाल्मिक कराडचं घबाड; एकाच इमारतीत कोट्यावधींची संपत्ती