पुणे : काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशातच महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पालिका जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यावरुन शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागची वेळी वेगळेवेगळे लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. सगळीच जर इलेक्शन्स आपल्या सोयीने लढायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी नाय मिळणार? हे त्यांचंही इलेक्शन आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे” असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.
दरम्यान, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. जे होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावयाचंच आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही तर त्याचा फटका पक्षाला तसचे पक्षवाढीला होत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत केले पाहिजेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याला २ हजार कोटींचा निधी द्या; काँग्रेसची अर्थमंत्री पवारांकडे मागणी
-बारामतीत पवार काका-पुतणे एकाच मंचावर; राजकीय घडामोडीकडे राज्याचं लक्ष
-‘मावळ पॅटर्न’ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता?; बावनकुळेंनी केला मोठा खुलासा
-‘HMPV’ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण