पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीपासून पवार कुटुंब कधी एकत्र याबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. बारामतीमध्ये ‘ताटात पडलं काय अन् वाटीत पडलं काय?’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोमिलनाचे संकेत दिले होते. अजित पवारांच्या याच वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी (७ जानेवारी) बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर तसेच पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत माध्यमांशी संवाद साधला आहे.
“पवार कुटुंबाबाबत माझ्या मनात काल आज आणि उद्याही मनभेद आणि मतभेद कधीच नव्हते. हे सर्वांना माहिती आहे. कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि समाजातील जबाबदाऱ्या उंबरठ्याच्या बाहेर”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“अद्याप पालकमंत्र्यांचा तिढा सुटला नाही. या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अनेक वर्ष सत्ता जवळून पाहिली आहे. मात्र पालकमंत्री पदावरून एवढी रस्सीखेच कधीही मी आजवर पाहिली नाही. मात्र पालकमंत्री पदात काय गूढ आहे, हे मला आजवर समजले नाही”, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-HMPV व्हायरसवर उपचार कसे करायचे? पालिकेच्या आरोग्य अधिकारी बोराडेंनी दिली महत्वाची माहिती
-‘महापालिकेच्या खात्यात ७ कोटी रक्कम पडून, पालिका व्याज मिळवण्यात व्यस्त’; वेलणकरांचा आरोप
-पुणे विमानतळावर भाजप युवा मोर्चा सचिवाला अटक; बॅगेत सापडले पिस्तूल अन् २८ जिवंत काडतुसे
-अजितदादा तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंपाशी? भर सभेत सुरेश धस यांचा सवाल
-संतोष देशमुख प्रकरणी पुण्यात जन आक्रोश मोर्चा; मनोज जरांगे पाटील मोर्चा अर्धवट सोडून का गेले?