बारामती : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या महाराष्ट्राने पवार विरुद्ध पवार सामना पाहिला. त्याचाच आता पुढचा भाग पहायला मिळणार आहे. बारामतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली. याच पराभवाचा वचपा अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत काढल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांने तयारी सुरु केली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बारामतीमध्ये जय पवार आणि युगेंद्र पवार हे दौरे करताना दिसत आहेत. जय पवार हे आभार दौरा म्हणून जरी तालुक्यात फिरत असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा दौरा आहे. तर येत्या काळात नवीन चेहऱ्यांना संधी देऊ, असं आश्वासन जय पवार यांनी दिलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार युगेंद्र पवार हे देखील बारामती दौरा करताना दिसत आहेत. यावेळी ‘विधानसभा निवडणुकीचा विचार करता जास्तीत जास्त पक्ष बांधणीची गरज ही शरद पवारांच्या पक्षाला आहे’, असे युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात १४ ते २२ डिसेंबर पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन
-सतीश वाघ हत्या प्रकरणी पोलिसांकडून चौघे ताब्यात; धक्कादायक माहिती आली समोर
-बांग्लादेशी रोहिंग्यानं पुण्यात घर घेऊन थाटला संसार; अवघ्या ५०० रुपयांत काढलं खोटं आधारकार्ड