बारामती | पुणे : बारामतीमधील कृषीक कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरवात झाली आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर आल्याचे पहायला मिळाले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना कोकोटेंनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केल्याचं पहायला मिळालं आहे.
‘पंकजा मुंडे म्हणाल्या ते खरं आहे. एवढ्या सकाळी उठण्याची ही माझ्या आयुष्यातील पहिलीच वेळ आहे. अजित दादांना माहीती आहे मी उशिरा उठतो, पण अजित दादांनी रात्री मला सांगितलं एक दिवस तसदी घ्यायला लागेल. मी म्हटलं, गरज असेल तेंव्हा मी खाद्याला खांदा लावून उभा असतो. खोटं वाटत असेल तर, पहाटेच्या शपथविधी आठवा. पहाटेच्या शपथविधीच्या फोटोत पाहा दादांच्या मागे मीच उभा आहे”, असं मानिकराव कोकटेंनी वक्तव्य केलं त्यांच्या या वाक्यावर अजित पवार यांनी स्टेजवर बसल्या जागेवरुनच उत्तर दिलं. “अरे तो पहाटेचा शपथविधी नव्हता. आठ वाजता होता”, असं अजित पवार म्हणाले आहेत. या दोघांच्या वक्तव्याने उपस्थितीतांमध्ये चांगलाच हशा पिकला.
वेळ असेल आणि काम असेल तर लवकर उठणे ही काळाची गरज आहे. बारामतीतील हे आधुनिक तंत्रज्ञान आणि डेमो यांची प्रत्यक्ष कर आज पाहिली या काळामध्ये सर्व गोष्टी गरजेनुसार घडत आहेत. मी देखील हाडाचा शेतकरी आहे, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप
-पुणे शहर पोलीस दलातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्तांचे आदेश
-‘मराठवाड्याचा विकास बारामतीसारखा करणार’; पंकजा मुंडेंनी केलं अजितदादांचं कौतुक
-पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा; माजी उपसरपंचाची गाडी केली जप्त
-आधी डिलिव्हरी बॉय बनून केली रेकी अन् नंतर…; पुणे पोलिसांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई