बारामती | पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराल अवघे ८ दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व पक्षांकडून प्रचाराला वेग आल्याचे दिसत आहे. उमेदवार एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहे. अशातच राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती मतदारसंघात काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार हे मतदारसंघात गल्लीबोळात फिरुन प्रचार करत आहेत. तसेच गावागावांमध्ये सभा घेत आहेत. बारामतीतील लोणी भापकर येथे बोलताना अजित पवारांनी येत्या काळात बारामतीचं सगळं मलाच बघायचं आहे, असे वक्तव्य केलं आहे.
“आगामी काळात बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीचं सगळं बघायचं आहे. मी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही. मी फुशारक्या मारत नाही, तर माझं काम सगळं सांगतं. लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता, तो तुम्ही घेतला. आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. काही प्रमुख नेते आहेत, त्यांच्यात माझे नाव आहे. नाव व्हायला वेळ लागतो. २००४पासून मला थोडं सीनियर म्हणायला लागले. तेव्हापासून मी राज्याच्या राजकारणात लक्ष घालायला लागलो. शरद पवार साहेबांनी ३० वर्षे राज्यात काम केल्यानंतर ते दिल्लीत गेले”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
लोणी भापकर गावात जाऊन ग्रामस्थांची स्नेहपूर्ण भेट घेतली. बारामतीतील सर्वच गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे तसंच ज्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज भासेल, त्या आपण उपलब्ध करून देऊ, असा शब्द गावकऱ्यांना दिला.#विजयी_भव_महाराष्ट्रवादी#MaharashtraElection2024 pic.twitter.com/cTtGnJFWeG
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 13, 2024
“मला इंग्लिश येऊ नाहीतर येऊ नये, परंतु मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी साडे ६ लाख कोटींचा बजेट सादर करतो. साडे ६ लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका नको करायला. मी सुनेत्राला उभा नव्हतं करायला पाहिजे”, असे अजित पवार यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-रासनेंच्या विजयासाठी तरुणांची फौज मैदानात; तरुणाईचा भाजपला मिळतोय पाठिंबा
-पर्वतीत आबा बागुलांची प्रचारात सरशी; घराघरात ‘हिरा’चीच चर्चा
-पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; शरद पवारांच्या आमदाराचा मोदींना सल्ला
-हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा