बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी माळेगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या नूतनीकरण सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीककर्ज भरावे, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अशातच अजित पवारांनी ‘बारामतीकरांनो, माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही’, असंही म्हटलं आहे.
“बारामतीकरांनो, माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही. बाकीच्यांचा घास नाही घास…. मला लोकांनी लाखापेक्षा जास्त मतं दिली आहेत”, असं म्हणत अजित पवारांनी आज तुफान फटाकेबाजी केली आहे. “सरकारने धोरण घेतलं आहे की, कॅनलमधून पाणी न देता बंद पाईपलाईनद्वारे पाणी द्यायचं. मी काही गोष्टी सांगत नाही, कारण मी बोललो की, हे लगेच टीव्हीला दाखवतात. त्याचा मला दुसरीकडे त्रास होतो. जूनपर्यंत तुमचे कॅनल बंद होणार नाहीत. आता म्हणाल कॅनलवरची कनेक्शन तोडू नका. बाकीच्या लोकांचा पण विचार करा की दत्तात्रय भरणे यांनी काय तिकडे हाताला चुना लावत बसायचं का?, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
काही जण येतात, संचालक मंडळाला भेटतात आणि सांगतात दर वाढवून द्या. दर वाढवून द्यायला पैसे तरी हवेत ना. काही कळत नाही, वळत नाही आणि दाखवायचे आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय. सुरुवातीच्या काळात माळेगाव कारखाना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत होता. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. प्रत्येकाचा काळ असतो. आम्ही पण बारकाईने विचार करतो. नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे. नदीच्या पाण्याला मी एकटा जबाबदार आहे का? अनेकांनी या आधी याचे नेतृत्व केले आहे, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवार गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसेभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, मात्र आता आमदारकी धोक्यात; नेमकं कारण काय?
-कर्जमाफी नाहीच! ‘३१ तारखेच्या आत शेतकऱ्यांनो पिककर्जाचे पैसे भरा’- अजित पवार
-स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप, थेट राज्याच्या सचिवांना लिहलं पत्र
-पोर्शे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; ‘हे’ २ पोलीस अधिकारी होणार बडतर्फी?
-थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता