पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. ही यात्रा आज बारामती मतदारसंघामध्ये पार पडत आहे. अजित पवारांनी आज बारामतीमध्ये रोड शो केल्याचे पहायला मिळाले. अजित पवारांच्या या रॅलीमध्ये बारामतीकरांसह लाखो समर्थक आणि राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले.
आज आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली. म्हणून निर्णय घेता आला. बारामतीत आता बदल होत आहे. आज लय पवार घरी यायला लागलेत. कधी आले नाहीत, असं लोक म्हणतील पण आता हे पण पवार आणि ते पण पवार घरी यायला लागले आहेत. मात्र पुढे काय करायचं हे तुमच्या हातात आहे, असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे.
राज्यातील २८७ मतदारसंघापैकी सर्वात जास्त विकासनिधी आपल्या बारामतीत दिला. मी लवकरच बारामतीची ब्ल्यू प्रिंट काढणार आहे. बारामतीत कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहे. अनेक योजना आपल्याला राबवायच्या आहेत. लोकांची कामे करण्याची धमक असली पाहिजे. नेतृत्व तसे पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या धक्क्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांनी बारामतीकरांना साद घालायला सुरवात केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीकर अजित पवारांना साथ देणार का हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शहराच्या मध्यवर्ती भागात मोठा दबदबा अन् नावाची दहशत; आंदेकरांचा इतिहास काय?
-सुनील शेळकेंनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी; गडकरी म्हणाले, ‘तुमचं काम झालंच म्हणून समजा’
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?
-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर