बारामती : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आणि राज्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे बारामती. राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना रंगत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपसोबत जात महायुतीमध्ये सामील झाले. कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पक्षासह पवार कुटुंबात देखील मोठी फूट पडली. अजित पवारांविरोधात अख्ख कुटुंब विरोधात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाच्या दोन्ही गटाकडून मतदारसंघात एकमेकांवर टीका केली जात आहे. अजित पवार यांचे सख्खे भाऊ देखीप त्यांच्या विरोधात आहेत. पवारांच्या काटेवाडीमध्ये अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांच्याबाबतच मत व्यक्त केलं. यावरून अजित पवार गटाकडून टीका करण्यात आली. यावर आता अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार आणि श्रीनिवास पवार हे सख्खे भाऊ आहेत. भावाचं नातं इतक्या सहजपणे तुटत नसतं. वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देत आले आहेत आणि देतीलही. राजकीय परिस्थितीत वेगळी भूमिका असू शकते. श्रीनिवास पवार जे काही बोलले ते अजित पवारांबाबत अजिबात बोलले नाहीत. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला आहे. काही शब्द त्यांनी वापरले ते वादग्रस्त ठरले”, असं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का?’ सुप्रिया सुळेंकडून श्रीनिवास पवारांची पाठराखण
-निवडणुकीत ब्लॅक मनीचा वापर होऊ नये म्हणून इनकम टॅक्सकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना
-उमेदवारी डावलली अन् वरिष्ठांनी समजूत काढली, तरीही मुळीकांची नाराजी कायम; मतदारसंघातील बैठकीला दांडी
-“पुण्यातल्या भिंतीवरची ‘कमळ‘ पुसा, नाहीतर आयोगाला ‘हाताचा पंजा‘ भेट देऊ”