पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी मंंत्री विजय शिवतारे यांनी चांगलेच दंड थोपटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिवतारेंचं बंड थंड झाले. आता सुनेत्रा पवारांना जिंकून आणण्यासाठी शिवतारे कामाला लागले आहेत. अजित पवारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करणारे विजय शिवतारे आता अजित पवारांच्या पत्नीचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
पवार कुटुंबावर सडकून टीका केल्यानंतर आता विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विजय शिवतारे यांच्या माघारीनंतर पुरंदरमध्ये महायुतीची समन्वय बैठक बोलवली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात आज महायुतीची समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.
अजित पवारांना इंदापूरची जनता साथ देणार नाही. मी जनतेचा कौल घेतला तेव्हा जनता त्यांच्या विरोधात आहे. त्यांना मतं मिळणार नाहीत. बारामतीचा साताबारा पवारांच्या नावावर नाही. अजित पवारांचा उर्मटपणा देखील आणखी गेला नाही त्यामुळे जनता अजित पवापांच्या विरोधात आहे. अशा शब्दात विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. तीही अजित पवारांच्याच मतदारसंघात सभा, बैठका घेत तसेच कार्यक्रमांना हजर राहले असता त्यांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतलं होतं. त्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढली होती. त्यानंंतर आता शिवतारे हे अजित पवारांच्या पत्नीचा प्रचार करणार असल्याने सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: गुरवारी पाणी पुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेकडून आवाहन
-आचारसंहितेचा भंग होतोय? निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल! अशी नोंदवू शकता तक्रार
-जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा; मोठे कारण आले समोर…
-Shirur Lok Sabha | ‘खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता?’ अमोल कोल्हेंना मतदारांचा खरमरीत सवाल