बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळी सुरु आहे. मात्र काही जागांवरील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दंड थोपटले.
शिवतारेंनी बारामतीच्या जागेवर अपक्ष लढण्याचा निर्धार केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्या उमेदवारीला महायुतीने विरोध केला होता. कारण बारामतीची जागा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी राखून आहे. त्यामुळे शिवतारे नाराज झाले होते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची विजय शिवतारेंसोबत मुंबईत बैठक झाली.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली बारामती निवडणुकीबाबतची भूमिका काय असणार हे स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. मात्र उद्यापही शिवतारेंनी आपली भूमिका मांडली नाही. त्यानंतर आता शिवतारे बारामती निवडणुकीतून माघार घेणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र, अजित पवारांना बारामती मतदारसंघात जाऊन भरसभेत ‘उर्मट’ म्हणणारे शिवतारे खरंच माघार घेऊन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणा का? की अजित पवारांविरोधात तगडी लढत देणार, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, विजय शिवतारे यांनी आज सासवडमध्ये मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण बारामती मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. सर्वांना आशा आहे की, विजय शिवतारे आजच्या मेळाव्यात तरी आपली भूमिका स्पष्ट करतील.
महत्वाच्या बातम्या-
-सामान्य पुणेकर ते खेळाडू अन् चित्रपटसृष्टीतील अभिनेते; मुरलीधर मोहोळांना वाढता पाठिंबा
-‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’; विजय शिवतारेंचा बारामती लोकसभेतून माघार?
-Satara Lok Sabha Election | उदयनराजेंचं नाव घेताच शरद पवारांनी थाटात उडवली कॉलर