पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे. बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावरुन शिवतारे यांनी महायुतीविरोधात बंड केले होते. मात्र आज त्यांनी बारामती निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढण्यावरुन माघार घेण्याचे कारण मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषद घेत सांगितले आहे.
“…म्हणून मी माघार घेतली”
“माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्ष चर्चा झाली. तरीही मी माझा निर्णय बदलला नव्हता. पण मला एक फोन आला. हा फोन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा होता. मी ऐकत नव्हतो म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री रागावलेही होते.”
“खतगावकरांचा मला एक फोन आला. मुख्यमंत्र्यांना तुमच्यामुळे अडचण होत आहे. महायुतीला तुमच्यामुळे अडचण होत आहे, असं त्यांनी मला सांगितलं. सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिले तर कदाचित १० ते २० खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. मी निवडणुकीला उभा राहिलो तर १० ते २० जागांवर आपले उमेदवार पडू शकतात, असं मला सांगितलं म्हणूनच मी माघार घेतली.”
दरम्यान, “मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं ऐकून घेतल्यानंतर मी माझ्या प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. स्वार्थाच्या पलिकडे जाऊन माझं आयुष्य माझ्या मतदारसंघाला, राज्याला समर्पित आहे. आमच्या या तहातून काही चांगल्या गोष्टी झाल्यावर मला आनंदच होईल. शेवटी आम्ही राजकारण हे लोकांच्याच हितासाठी करतो. मी मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्या त्यांच्यापुढे ठेवल्या”, असंही विजय शिवतारे यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रोहित पवारांनी अजितदादांना डिवचल; म्हणाले “बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते…”
-अजित पवारांवर सडकून टीका करणारे शिवतारे तलवार म्यान करणार? पुरंदरमध्ये नेमकं काय घडणार
-सामान्य पुणेकर ते खेळाडू अन् चित्रपटसृष्टीतील अभिनेते; मुरलीधर मोहोळांना वाढता पाठिंबा