पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात चर्चेच्या बारामती मतदारसंघामध्ये पवार कुटुंबामध्ये तुफान कलगितुरा रंगल्याचा पहायला मिळात आहे. राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. त्यातच बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सस्पेन्स ठेवला आहे. तरीही महायुतीकडून उमेदवारीसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
महाविकास आघाडीकडून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर आणि महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. ‘बारामतीमध्ये केलेल्या सर्व्हेनुसार सुनेत्रा पवार मागे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ते आता दहावा सर्व्हे करतील आणि मग उमेदवार जाहीर करतील’, असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
“बारामती मतदार संघाचे ९ सर्व्हे अजित पवार गटाकडून झाले आहेत. त्यात त्यांचे उमेदवार सर्व सर्व्हेमध्ये मागे असल्याचे दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळेच त्यांच्या सर्व्हेमध्ये पुढे दिसत आहे. त्यामुळे ते आता दहावा सर्व्हे करतील आणि त्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते हे केवळ जनतेला खुश करण्यासाठी नाराज ते अजित पवारांचा प्रचार करणार नाहीत. सुप्रिया सुळे यांचे लीड अडीच लाखांच्यावर असेल”, असा दावाही रोहित पवारांनी केला आहे.
विजय शिवतारे यांनी आधी अजित पवारांवर टीका केली होती आणि आता ते यू-टर्न घेत आहेत. नेत्यांना भेटल्यावर भूमिका बदलणार असाल तर हे लोकांना हे आवडणार नाही. तुम्ही अजित पवारांच्या विरोधात बोललेले व्हिडिओ लोकांपर्यंत गेले आहेत ते आता डिलीट कसे करणार?, खोचक सवाल रोहित पवारांनी विजय शिवतारेंना केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांवर सडकून टीका करणारे शिवतारे तलवार म्यान करणार? पुरंदरमध्ये नेमकं काय घडणार
-सामान्य पुणेकर ते खेळाडू अन् चित्रपटसृष्टीतील अभिनेते; मुरलीधर मोहोळांना वाढता पाठिंबा
-‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’; विजय शिवतारेंचा बारामती लोकसभेतून माघार?
-Satara Lok Sabha Election | उदयनराजेंचं नाव घेताच शरद पवारांनी थाटात उडवली कॉलर