पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या बारामती मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केलेलं बंड मागे घेतलं. विजय शिवतारे यांनी बंड मागे घेताच आता जेजुरीमधील मतदारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारला मोठा इशारा दिला आहे. जेजरुमधील पाणी प्रश्न सुटला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, असा इशारा जेजुरीकरांनी दिला आहे.
जेजुरी शहरात दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावरुन जेजुरीतील पाणी प्रश्नावरुन सर्व ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर हे आंदोलन थाबले. मात्र, १० दिवस पाणी पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांनी नगरपालिकेत संताप व्यक्त केला आहे. येत्या ८ दिवसांत पाण्याचा प्रश्न मिटला नाही, तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार, असा थेट इशारा देणारं निवदेन जेजुरीकरांनी दिलं आहे.
जेजुरीत १० दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाही. याबाबत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना आपल्या तक्रारी सांगितल्या. बैठकीत आक्रमक ग्रामस्थांनी ‘होळकर तलाव भरून वाहतो, मात्र पाणी साठवण्याकडे दुर्लक्ष’ केल्याचा आरोप केला आहे. पाणी आले की वीज खंडित केली जाते, याकडेही लक्ष वेधले आहे.
दरम्यान, त्यावर उपाय म्हणून ‘वीर धरणातून जेजुरीसाठी कायम पिण्यासाठी पाणी द्यावे, टंचाईच्या काळात प्रत्येक प्रभागात टँकर सुरू करावेत, एमआयडीसीच्या पाणी योजनेतून शहराला पाणी द्यावे, ठिकठिकाणी हातपंप सुरू करावेत, विहिरी अधिग्रहण कराव्यात, दुष्काळात नाझरे धरणातील गाळ काढावा’, अशा अनेक काही मागण्या जेजुरीतील ग्रामस्थांनी केल्या आहेत. जेजुरीकांचा पाणी प्रश्न सुटतो का? जेजुरीकरांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर काय परिणाम होतील? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Shirur Lok Sabha | ‘खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता?’ अमोल कोल्हेंना मतदारांचा खरमरीत सवाल
-वडगावशेरीत मुळीक-मोहोळ-टिंगरे अन् पठारे एकाच मंचावर; महायुतीच्या मेळाव्यात महाविजयाचा निर्धार
-Aarti Singh | आरती सिंगच्या घरी सुरुय लगीनघाई! आरतीचा ‘न्यु लूक’, इन्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस