इंदापूर : बारामती लोकसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळावा घेतला आहे. याचे आयोजन भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. या मेळाव्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाप्रमुख अंकिता पाटील यांनी भर मंचावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला आहे.
“देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत आणि मनापासून आभार..कारण इंदापूर तालुक्याचा जो ज्वलंत प्रश्नावर आपण संघर्ष करत आहोत. त्या संघर्षाबाबतही चर्चा सुरु होती. आपला जो मागच्या २० ते २५ वर्षांपासून संघर्ष सुरु होता त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला त्यांचा बहुमोल वेळ दिला. आमची ३ वेळा बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सागर बंगल्यावर आमच्या २०० प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं. त्यांच्याशीदेखील संवाद साधला. त्यासाठी मी आभार मानते”, असं अंकिता पाटील म्हणाल्या आहेत.
“साहेब, आम्हाला इथे खरंच खूप त्रास होतोय. इथे बसलेल्या आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे खोटे नाटे गुन्हे दाखल आहेत. ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. आमच्या सरपंचांना त्रास दिला जातोय. त्यामुळे इतका त्रास इंदापूर तालुक्यात गेल्या ७ ते ८ वर्षात झालाय जो कधीच झालेला नाही. इंदापूर तालुक्याची सुसंस्कृत अशी ओळख होती. पण आज इंदापूर तालुक्याचं नाव निघालं तर भ्रष्टाचारांच्या अवतीभोवती आणि हा ठेकेदारांचा तालुका अशी वाईट ओळख निर्माण झालीय. खरंच हे खूप दुर्देवी आहे”, अशी एक ना अनेक तक्रारींचा पाढा अंकिता पाटील यांनी फडणवीसांपुढे वाचला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | बियर कंपनीने बुडवला ५७ कोटींचा राज्य सरकारचा कर; कंपनीवर गुन्हा दाखल
-Lok Sabha Election | उमेदवारानं मत मागण्यासाठी लढवली नवी शक्कल; वस्तारा हातात घेत म्हणाला,…