पुणे : राज्यात तिसऱ्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. महायुतीच्या बारामती लोकसभा निवडणुकीत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती मतदारसंघातील उंडवडी येथे सभेत शनिवारी बोलत होते. सभेत बोलताना अचानक अजित पवारांना आमदार बच्चू कडू यांचा फोन आला.
आमदार बच्चू कडू यांचा फोन आला, असं सांगत एक जण अजित पवारांजवळ आला, त्यावर अजित पवार म्हणाले, थांबा जरा भाषण करतो आहे, असं म्हणत अजित पवारांनी बच्चू कडूंचा फोन ठेवला आणि पुन्हा पुन्हा भाषण सुरु ठेवलं. त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा मतदारांना विकास कामे, निधीबाबत सागंण्यास सुरवात केली.
‘मी इतर बाबतीत काम केलं पण, मला पाण्याचा प्रश्न मी सोडवत होतो. मोदींना मी सांगितले आहे की, पाण्यासाठी मला निधी पाहिजे. भावनिक होऊ नका, अजून १० वर्ष तुमचं काम करू शकतो. इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. प्रत्येकाला संधी दिली जाते. मी कामाला सुरुवात केल्यावर मागे वळून बघितलं नाही. केंद्राचा निधी आणला’, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“..म्हणून हर्षवर्धन पाटील आणि मी एकत्र आलो”
“अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे जमत नाही, पण आम्ही मिळते-जुळते घेतलं, हे का केलं तुम्ही जाणून घ्या. पाण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवलं. जनतेची कामे व्हावी यासाठी मी सरकारमध्ये गेलो. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही खूप भांडलो. आता हर्षवर्धन पाटील म्हणाले, आपण साठीच्या पुढे गेलो, अजून किती दिवस असं राहणार, म्हणून आम्ही एकत्र आलो”
महत्वाच्या बातम्या-
-मोदी-गांधींच्या सभेनंतर पुण्यात ओवैसींची तोफ धडाडणार! राजकीय वातावरण ढवळून निघणार
-“तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्यांना…”; रोहित पवारांचं अजितदादांना आव्हान
-“कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलीय, आढळराव पाटील नक्की विजयी होतील” -आमदार तुपे
-‘मी कामाचा माणूस आहे, लवकरच बारामतीचं चित्र बदलून टाकेल’; अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द
परभणीच मतदान होताच महादेव जानकर बारामतीत अॅक्टीव्ह, म्हणाले “दादांनी मला….”