बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यातील सर्वात हायहोल्टेज लढत म्हणून बारामतीकडे पाहिलं जात. बारामती नागरिकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा साद घातली आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीजवळील डोर्लेवाडीमध्ये शनिवारी सभा घेतली. या सभेमध्ये अजित पवारांनी ‘देशात पुन्हा मोदी सरकार आले तर मी तुमच्या विकासासाठी कशाप्रकारे निधी आणू शकतो’, हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
“जे विरोधात आहेत, ते उसाला पाणी देतात पण त्यांना कळत नाही, हे पाणी महायुतीने आणले. नाहीतर इथे धुरळा झाला असता धुरळा. मी कामाचा माणूस आहे. हे चित्र मी बदलून दाखवीन. फक्त भावनिक होऊ नका. कोण आपल्याला कॅनलला पाणी देऊ शकेल, कोण आपल्या समस्या सोडवू शकेल, याचा विचार करा. तुम्ही ७ वेळा मला निवडून दिले, ५ वेळा मी उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे माझी अनेक लोकांशी ओळख झाली”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“तुम्ही बघितलं असेल, मी पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी कशा गप्पा मारत होतो. मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे, हे मी त्यांना सांगितले. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. नाहीतर पुढची पिढी मला माफ करणार नाही. अजित पवारने सत्तेत राहून काय केले?, असा प्रश्न ते विचारतील. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भावनिक होऊन मतदान करु नका”, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
“आम्हाला वडीलधारी लोकांबाबत आदर आहे. ते जे सांगतील ते आम्ही ४० वर्षे ऐकले. आता विकासासाठी हा निर्णय घेतला. कुणाला त्रास देण्याची भूमिका माझी नव्हती. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला सुनेत्रा तडा जाऊ देणार नाही. मी कामाचा माणूस आहे, हे चित्र मी बदलून दाखवेन. फक्त भावनिक होऊ नका”, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
परभणीच मतदान होताच महादेव जानकर बारामतीत अॅक्टीव्ह, म्हणाले “दादांनी मला….”
-शरद पवार गटाला मोठा धक्का; मतदानापूर्वी रोहित पवारांचे कट्टर समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
-नाराळाच्या तेलाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
-मोहोळांची ताकद वाढली; अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा